विजयकुमार राउत
देव कोणीच पाहिला नाही. तरीही तो आहे किंवा नाही, या वादात आपण अशी कितीतरी वर्षे खर्ची घातलेली आहेत. आणि अगदी जगाच्या अंतापर्यंत तरी हा प्रश्न सुटेल, अशी सुतराम शक्यता नाही. उलट शिक्षणाचा प्रचार, प्रसार वाढला आणि माणसे सुशिक्षित किंवा उच्च विद्याविभूषित म्हणून मिरवायला लागलीत, तरी देवाचा वाद संपला नाही आणि नादही संपला नाही. पुरोगमी विचारसरणीचे सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते श्रीराम लागू हे जर्मन तत्वज्ञ फेड्रीक नित्शेचेच वाक्य घेउन "देवाला आता देवघरातून रिटायर्डच केले पाहिजे', असे बिनधास्त म्हणतात. अनेक वर्षे आपल्या देवघरात असलेल्या परमेश्वराने आपले कुठलेच भले केले नाही. तरीही तो गेल्या अठ्ठाविस युगांपासून जागा अडवून बसला आहे. समाजात अनेक स्थित्यंतरे आलीत ..सुधारणांचे वारे वाहू लागलेत. माणूस विचार करू लागला. प्रत्येक गोष्टीमागचे कार्य-कारण भाव शोधून काढणे त्याच्या मेंदूला शक्य झाले आहे. माणसांनी नवीन विचार जन्माला घातले आहेत. अनेक नवीन शोध लावून सुखसमृद्धीचे जग निर्माण केले. तरीही माणूस हा "देव' या संकल्पनेला "फेविकॉल'च्या मजबूत जोडासारखा चिकटून बसला आहे. दिवसेंदिवस देवा धर्माचा वाद मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच आहे. जगात देव धर्माच्या नावावर मोठया प्रमाणात कत्तली, दंगली होत आहेत आणि होत राहतील. वर्ण व जातीय वादातून पाच हजार वर्षात तीन हजार युद्धे लढल्या गेलीत, असा जागतिक इतिहास सांगतो. परंतु शांतीचा मार्ग अंगीकरणेच कुणाला जमले नाही. आतापर्यंत कुठल्याच धर्माने दुस-या धर्मातील माणसाशी वैर धरावे, असे कुठेच सांगीतले नाही.
देवधर्माच्या नावाने निर्माण होणारी भांडणे कधीच शब्दांच्या बुडबुडयांतून बाहेर पडणार नाहीत का? "मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना' असे म्हणून आपण एकमेकांशी नाते जोडणार आहोत की नाही ? एकमेकांच्या मनातील दरी अधिकाधिक विस्तारीत असताना रूंदी कमी करण्याचे काम करणार आहोत की नाही ? या ग्लोबलायझेशनच्या काळात किती काळ आपण कुपमंडूक वृत्तीने जगून स्वतःची भलावण करणार आहोत? धर्माचं मूळ स्वरूप स्वच्छ आहे. नितळ, स्वच्छ पाण्यासारखं आहे. जीवनाला पुरक आहे. ते समजून घेण्याचा कधीतरी प्रयत्न होईल का? आहे ते इतके सोपे आणि सुलभ आहे. त्यात कुणाच्याही मध्यस्थीची मुळीच गरजही नाही. त्यामागची भावना समजून घेणे मुळीच कठीण काम नाही. आतापर्यंत अनेक महापुरूष आणि विचारवंतांनी या भूतलावर जन्म घेतला. त्यांनी दिलेले विचारधन आपल्याजवळ आहे. देवाचे, परमपित्याचे स्वरून समजून, जाणून घेण्याकरीता त्यांनी सोप्यात सोपे मार्ग सांगीतले आहेत. पण कोणीच समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाही, हेच खरे आश्चर्य आहे. ग्रंथांच्या पानावर चढलेली काळाची धुळ बाजूला सारल्यास त्या खाली असलेले नितळ सत्य समजने सोपे होईल.
सर्वप्रथम "देव' ही संकल्पना कशी निर्माण झाली, ते पाहणे रंजक ठरेल. समाजशास्त्रीयदृष्टया देवाचा जन्म हा मानवाच्या आदिम काळात भितीच्या वा उपयोगीतेच्या पोटी झाला. आदिम काळातील मानव हा जंगलात निराधार, निराश्रीतच होता. दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्या अवतीभवती घडणा-या भयंकर आणि अनियंत्रीत घटनांतून त्याला आपल्यापेक्षा प्रचंड मोठी शक्ती आकाशात कुठेतरी अस्तित्वात आहे, याचे भान झाले. उदाहरणार्थ पाउस, वादळवारा, साप किंवा हिंस्त्र प्राण्यांची भिती त्याला वाटू लागली. दिवसरात्र कोसळणारा पाउस, अचानक येणारी वादळे, अंगावर हल्ला करणारे हिंस्त्र प्राणी यातून त्याच्या मनात एक भिती तयार झाली. जी शक्ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे, अवाढव्य आहे, तिच आपला बचावही करू शकते. अशा शक्तीसमोर नतमस्तक होणे, हे मानवी स्वभावाप्रमाणे आलेच.
हिंदू धर्मातील वेद, उपनिषदात "देवा'चा उल्लेख अशा उपयोगीतेतूनच करण्यात आला आहे. कार्यकारण- भाव समजला नाही की मनुष्यप्राणी देव किंवा चमत्कार मानून मोकळा होतो. वेद व उपनिषदातील अर्थ समजून घेण्याचा ठेका दुस-या कुणाकडे असल्यामुळे तो इतरांनी समजून घेउ नये, यासाठी समाजात काही प्रस्थापित वर्गाने व्यवस्था निर्माण केली. त्या व्यवस्थेच्या नितीनियमांमुळे त्याला कधीही न संपणारी गुलामी बहाल झाली. दररोज उगवणारा सूर्य , त्याची उपयोगीता , चंद्र-सूर्याला लागलेले ग्रहण, ग्रहता-यांची स्थिती यातून मनुष्यासमोर आपली मर्यादी अधोरिेखत झाली.
आजच्या काळातही आपण बैलाला देव माणून पोळा सण साजरा करतोच की ! अगदी अलीकडच्या काळातील संगणकाचीही पूजा करण्यात आपल्याला कुठलीच कमीपणा वाटत नाही. मनुष्य समाजशिल प्राणी म्हणून अस्तित्वात आल्यानंतर सण, उत्सव निर्माण झाले, आपण निसर्गातील पशू, पदार्थ याच्यापासून उपयोगीता शिकलो. जे जे उपयोगी येत असेल , ते ते देव असा समज निर्माण झाला. अशाप्रकारे मनुष्य "देव' मानण्याला नकळत तयार झाला. यासाठी त्याला फारसे कष्ट घेण्याची गरज पडली नाही. भिती आणि त्यातून सुटका करण्यासाठी धडपडणे हा माणसाचा स्वभावच आहे. सर्वत्र देवाला शोधताना माणसाची पूरती दमछाम झाली. तेहतीस कोटी देवांची पूजा करून पुन्हा त्यांची अपत्ते नव्याने तयार करण्यात आम्ही धन्यता मानली आहे. शिवाय मंदिेरे, जंगल द-यात शोधता शोधता त्याने आकाशातही देवाचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला. तिच त्याची तिर्थस्थळे झालीत. या सर्व परिस्थितीत माणूस मात्र स्वतःपासून दूर दूरच होत गेला. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर तो पुरता "बाहेरख्याली' झाला. आणि तो युगायुगांपासून नुसता बाहेर भटकतच राहिला.
या संदर्भात एक सुंदर उर्दू शब्द आठवतो. ज्याने कोणी "खुद' हा शब्द निर्माण केला, त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच वाटते. खुद म्हणजे मी.. स्वतः .... आणि खुदा म्हणजे देव,, परमेश्वर. परमात्मा जे काही म्हणत असाल ते. 'खुद' पासून "खुदा' शब्द आला असावा. खुद आणि खुदात फरक तो काय ! खुदापर्यंत पोहचायचे असेल तर खुदलाच म्हणजे स्वतःला समजून घ्यावे लागेल. फरक एवढाच आहे की "खुदा' या शब्दात फक्त एकच मात्रा लागते. हा प्रवास करायचा झाल्यास आयुष्यात फक्त एक दांडीच तेवढी कमवावी लागते. डोळयावरचा एक चष्माच केवळ बदलावा लागतो. मग उरलेला प्रवास तुम्ही "खुदा' होण्याचा असतो. परंतु तेच जमत नाही. कारण आम्ही स्वतःला ओळखलेच नसते. आत्मा प्रत्येकाजवळ आहे. परंतु परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माझया ठिकाणी जसा आत्मा आहे, तसाच दुस-याच्या ठिकाणीही आहे. मला दुःख झालं तसंच इतरांना होउ शकते, इतरांनाही भाव भावना आहेत. ही जाणिव निर्माण झाली की परमात्म्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे समजावे. तुमच्यातच तुमचा परमात्मा किंवा देव लपलेला आहे. तुकोबाराया म्हणतात "तुझे आहे तुजपाशी.. परि तू भूलला वरिलीया रंगाशी'! हरीण आणि त्याच्या बेंबीत असणारी कस्तुरी ही त्याला माहित नसल्यामुळे तो बेभान होउन सुगंधाच्या दिशेने धावत सुटतो .. वेडा होतो..अगदी उर फुटेस्तोवर धावत जातो. तसेच आहे जीवनाचेही.
तथागत भगवान बुद्ध, महर्षी अष्टावक्र, भगवान श्रीकृष्ण, जर्मनीचे तत्वज्ञ नित्शे किंवा अलीकडचे भगवान ओशो आदींनी मांडलेले विचार समजून घेतल्यास आपल्याला "देव' कोणाला म्हणावे ...देव नावाची शक्ती कुठे वास करते, याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.
भगवान श्रीकृष्णाची गीता खरोखरच अप्रतिम आहे. त्यातील तत्वज्ञान अद्वितीय आहे. बुद्धीला पटेल असे आहे. खुद्द भगवान श्रीकृष्ण म्हणतात की "माझा कधी जन्म झाला नाही, मृत्यूही झालेला नाही. मला कुठलेच गुण व निर्गुण लागू होत नाही. मी अजन्मा आहे.' याचा अर्थ विज्ञानाच्या कसोटीवर जर आजच्या काळात घासून बघितले तर एकच सिद्ध होते. आपला जीवनप्रवास पृथ्वी निर्माण झाल्यापासून म्हणजे पाच अब्ज वर्षांपासून सुरू झालेला आहे. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात माणूस उत्क्रांत होत होत आजच्या टप्प्यापर्यंत येउन पोहचला आहे. अनंत पिढयांचे "डीएनए' आपल्यात आहेत. आणि असंख्य जन्म अशीची साखळी सुरू राहणार ... एका कॉम्यूटरमध्ये जी छोटीसी "चिप' असते तिच्यात सर्व "प्रोगॅमिंग' साठवलेले असते, तसेच माझया पूर्वजांचे गुणदोष मलाही लागू पडतात. गुणदोषांचे हस्तांतरण केवळ या पिढीतून पुढच्या पिढीत होत असते. जे गीतेत सांगीतले आहे नेमके तेच विज्ञानही सांगते. तुमच्यात तुमच्या पूर्वजांचे "डीएनए' अधिक मात्रेत तर आईवडिलांचे केवळ वीस टक्केच डीएनए आपल्यात दिसतात. आणि वीस टक्के निसर्गातील नवीन गुणसुत्र घेउन आपण जन्माला येत असतो.
मी कालही कुठल्या ना कुठल्या रूपात होतो आणि उद्याही कुठल्या ना कुठल्या रूपात राहिलच. हेच सुत्र समजून घेतल्यास गीतेतील विज्ञान स्पष्ट दिसेल. अध्यात्म हे विज्ञानाच्या कसोटीतून समजून घेण्यास उलट मदतच होईल. मी आहे म्हणजे अनंत जन्मांपूर्वीही मी होतोच. आणि अनंत जन्मापर्यंतही मीच राहिल. आजचे माझया पूर्वजाचे डीएनए घेउन पुढील पिढी निर्माण होईल, यात तिळमात्र शंका नाही..
तथागत गौतम बुद्धही हेच म्हणतात. "अत्त दीप भव' तू स्वयं दीप हो. ..ते मनुष्यमात्राला प्रकाशमान करणारा दीपक व्हायला सांगतात. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञात "देव' वगैरे संकल्पना अजिबात बसत नाही. म्हणून ते माणसाला देव वगैरे म्हणण्याच्या भानगडीत मुळीच पडत नाहीत. ते म्हणतात की "तूच तुझा दीपक होउन चल.. म्हणजे तुला कुणाचीच गरज भासणार नाही...तुला देवाची किंवा अलौकिक शक्तीची मुळीच आवश्यकता नाही.' बुद्धांनी मनुष्याला स्वयंदीप बनण्याचा सांगीतलेला मार्ग "अष्टांग मार्ग' होय.
दुसरा महान विचार महर्षी अष्टावक्रांनी मांडला. अष्टावक्र महागीतेत म्हणतात, हे मानवा ! तू तर अप्रतिम आहेस. तुझया ठिकाणी चैतन्य आहे .परंतु ते सदया काजळलेले आहे. त्यावर फुंकर मारली की त्यावर चढलेली काजळी दूर होउन तुझे मूळ चैतन्यमय रूप दिसेल. फ्रेड्रींक नित्शे तर म्हणतो , की मी असताना दुसरा कुठलाच परमात्मा राहूच शकत नाही. दुसरा परमात्मा संभवच नाही. कारण मीच मोठा परमात्मा आहे. दुसरा कोणी परमात्मा असेल तर मी स्वतःला गोळया घालून ठार करेन. वेद , उपनिषदे म्हणतात "अहं ब्रम्हास्मी' आणि सुफी संत मंसूर यांनी " अनलहक' ची दिलेली साद दुसरे तिसरे काहीच नसून हेच सार आहे. म्हणून स्वतःला उन्नत करावे जेणेकरून खुद पासून "खुदा' पर्यंतचा प्रवास करणे अधिक चैतन्यदायी व आनंददायी होईल. शेवटी एक शेर आठवतो-
ये सच है की आदम खुदा नही
लेकिन खुदाके नूरसे आदम जुदा नही !
परमेश्वर होण्याची पात्रता फक्त माणसातच आहे. कारण खुदाचा "नूर' माणसात आहे. स्वतःला ओळखले की अनंत जन्माचा प्रवास इथूनच सुरू होतो.