Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 2 दिसंबर 2014

खालती डोके...

खालती डोके नि वरती पाय देवा!
हा कसा उल्टा जमाना हाय देवा !!

भेटला कोणी न येथे पाजणारा
आजचाही दिवस गेला "ड्राय' देवा !

ऐैश आता जाहली अभिषेकची...
द्या कुणी सलमानलाही "राय' देवा !!

समजलो ज्याला कधी मी सांब भोळा
तोच अल्लाची निघाली गाय देवा !!

"रॉंग' गेला हा तुझा नंबर कसा?
मारला कित्येकदा मी "ट्राय' देवा !!

पैसाच करतो राज या दुनियेवरी
अन्‌ गरीबाचाच वाली नाय देवा

शोध हा आहे नव्या शतकातला
माणसाचा जाहला "बोन्सॉय' देवा !!

                                                                 विजयकुमार राउत

 
Blogger Templates