Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शनिवार, 1 अगस्त 2015

सत्यम शिवम सुंदरम


                                                                                       विजयकुमार राउत

हमारे बुर्जूग कहा करते थे "सत्यम शिवम सुंदरम' जानेमाने फिल्म निर्देशक कपूर की इसी नाम की फिल्मभी आयी थी. उसमे एक गीतभी था. "सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है..' सत्य बहोत ही सुंदर और पवित्र होता है...सत्य बहोतही सरल और साधा होता है. इसलीये तो उसे शिव यानी परमात्मा कहा जाता है. लेकिन हमको व्यावहारीक जीवन मे असत्य स्वीकारना बडाही सरल लगता है. क्‍योकी हमारे सामने जो चिज चमचमाती है , उसीकी ओर हमारे कदम बढने लगते है . असत्य तो हमे बडा प्रभावित करता है. हमारा उसी के प्रति आकर्षण हो जाता है. जो हमारे फायदे का होता है उसेही हम सत्य कहते हेै. जो नुकसानदायक होता है वो हमारे लिये असत्य हो जाता है. सत्यपर सिर्फ हमारीही मालकी होती है ऐसा हम समजते है.धीरे धीरे जिंदगी मे एैसीही हमारी सोच बन जाती है.लेकीन वास्तविकता जाने तो सत्य फायदा और नुकसान के पार होता है. सत्य किसकी पैरवी नही करता बल्की सत्य सत्य होता है. यह तथ्य जिस दिन हम अपना लेते है तब हमारे जिवन मे परिवर्तन शुरू होना शुरू हो जाता है.

खलील जिब्रान की एक कहाणी है. एक बार सत्य और असत्य की दो देविया स्वर्गसे उतरकर जमींपर आ गई. स्वर्ग से लेकर पृथ्वी तक का उनका सफर था. उनके कपडे बहोतही मैले हो चुके थे. धुल चढ गई थी कपडो पर . तो उन्होने एक नदी मे जाकर स्नान करने की इच्छा जतायी . औरे वे दोनो नदी के पास गई. दोनोने अपने बदन से कपडे उतारे, किनारे पर रखे और नदी मे कुंद पडी. तैरते तैरते सत्य की देवी बडी दूर तक चली गई थी. और असत्य की देवी बहुत पिछे रह गई. उस समय असत्य की देवीके मन मे विचार आया. वापस पलटकर सत्य के देवी के कपडे उसने पहन लिये और भाग गयी. सत्य की देवी स्नान करने के बाद किनारे पर आई . उसके कपडे किनारे से गायब हो चुके थे. सुबह हो चुकी थी. नदी किनारे लोगोकी चहल पहल अब बढनेवाली थी. उसने तुरंत असत्य के देवी के कपडे पहनकर अपनी लज्जा ढांकणे की कोशिश की और वहा से भाग गयी. तबसे लेंकर अभी तक हालत वैसेही कायम है. सत्य अपने वही फटे पुराने कपडे पहने है. और असत्य की देवी आकर्षक खुबसुरत लिबास मे दुनियामे इतराते हुवे घुम रही है. जिब्रान की यह कहानी काफी मशहूर है. जिब्रानने हकीकत बयाण की है इस कहानीमे. सत्य बहोत साधे लिबास मे घुम रहा है. हमारी संस्कृतीमे अक्‍सर ऐसा हमको देखने को मिलता है. धन की देवी लक्ष्मी और विद्या की देवी सरस्वती. चित्र मे दोनो एक साथ होती है. सरस्वती जो की कला व विद्या की देवता है. वे साधे, सफेद कपडे पहनकर हाथो मे विणा लेकर प्रसन्न भाव दर्शाते हुवे बैठी है. और धन की देवी आभुषणोसे मढी हुवी आशीर्वाद देने के लिये हाथो से सोने-चांदीकी बरसात करते दिखाई देती है. हमारे समाज की निव को हम देखते है तो साफ जाहिर होता की किसी गुणवान व्यक्‍ती को पैसो के अभाव के कारण पिछे रह जाता है. हालाकी गुणवान और चारित्रयवान व्यक्‍ती हमेशा अपने कर्म को साधना और तपस्या समझकर जिता है. वो लोगो के नजर मे बिचारा गरीब कहलाता है. हालाकी वह दिलसे बहुत अमीर होता है. उसे पैसो के सामने अपमानीत होना पडता है. दुनिया चमकनेवाले जुगनू को बहुतही पसंद करती है. लेकीन वे जानते नही की चमकनेवाला जुगनू ज्यादा देर तक चमककर रोशनी नही दे पाता है.

वैसे देखा जाये तो असत्य पहचानने मे और सत्य की परख करने मे हमारी आँखे हमेशा धोखा खा लेती है. जो हमारा ध्यान अपनी ओर आकर्षित कर लेता है वो कभीभी सत्य नही हो सकता. थोडा गौरसे देखेंगे तो असली बात समझ मे आ जाती है. चिनमे एक रूषी थे. उनकी सत्यके बारे मे बहुतही ख्याती थी. वो सत्य के सामने कभीभी समझोता नही करते थे. राणीने कई बार उसकी परीक्षा लेने के लिये उसे महल आने की खबर भेजी. लेकीन उस तपस्वीने राणी की आज्ञा को ठुकरा दिया. क्‍योकी कोई सत्य के शिवाय किसी और की सत्ता वे मानते नही थे. इसलिये वे राणीसे मिलने के लिये उत्सुक नही थे. राणी को गुस्सा आ जाता है. और वो उनकी परीक्षा लेने उनके आश्रम मे चली जाती है. तपस्वी से कहती है के तुम अगर सच्चे तपस्वी हो तो मेरे हाथ मे दो फुल है. उनमेसे असली कौनसा है और नकली कौनसा उसे पहचानो. तपस्वी समाधी मे लिन थे. आश्रम के दरवाजे बंद थे. उन्होने आँखे खोलते हुवै क्षणभर उस राणी को देखा और कहा, तुम्हारे दाये हाथ मे जो फुल है वो असली है और बाये हाथ का फुल नकली है. राणी अचंभित रह गयी. क्‍योकी साधू महाशय ने आँसे बंद करके यह निर्णय लिया था. राणी प्रभावित होकर साधू के चरणो मे गिर पडी. और उसने तपस्वी को पुँछा...हे तपस्वी आपके जवाबसे मै अचंभित रह गई. आँखे बंद होने के बादभी आपने यह अनुमान कैसे लगाया की मेरे दाये हाथ का फुल असली और बाये हाथ का फुल नकली है?साधू महाशय मंद मंद मुस्काये और उन्होने कहा , हे राणी आपने आश्रम मे जैसेही प्रवेश किया और असली फुल की महक मेरे नाक तक आ गई. फिर मैने आँखे बंद करने के पहले देखा की मख्खी आपके दाये हाथ मे जो फुल था उसपर बैठी है .. और मेै उस फुल की असलीयत पहचान गया. तुम्हारे दुसरे हाथ मे जो फुल था वह केवल कागज का फुल था, नकली था, यह बात मै जान गया. असली फुल नकली फुलसे जादा आकर्षक था. लेकीन उसपर कोई मख्खी बैठे भी कैसे?

जो लोग सत्य की झलक पा लेते है.. उनकी जिंदगी कुछ और हो जाती है..सुकरात जिसने सत्य की खोज की. सत्य पाने के लिये उसने जहरतक पि लिया. क्‍योकी वह जानता था की सत्य के सामने अपनी जान गई तो उसमे क्‍या बडा हुवा? गॅलीलिओ को भी सत्य का ज्ञान हुवा था. इसलीये उसने कैद पसंद की... और मर गया.

सत्य की यात्रा बडी लंबी और आनंददायी होती है. क्षणैक सुख के लिये हम झुठ का सहारा लेते है. ऐसा जरूरी नही की सत्य हमेशा हारही खा लेता है. लेकीन सत्य को निहारणे मे थोडा समय जादा लगता है. क्‍योकी उसकी यात्रा का कही हिसाब नही. असत्य की उम्र बडी छोटी होती है.

                                                                     विजयकुमार राउत

शनिवार, 25 जुलाई 2015

शिक्षणाच्या नानाची टांग


                                   विजयकुमार राऊत

"पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, जो खेलोगे कुदोगे तो होंगे खराब' हे गाण लहानपणी रेडीओवर नेहमी ऐकायला मिळायचं. काळ बदलला. चित्र बदललं. आता "शिक्षणाच्या आवशीचा घो' अशा शिव्या हासडण्यापर्यंत नव्या पिढीची मजल गेली. आवडत्या खेळात रमून सचिन तेंदूलकरसारखा क्रिेकेटपटू तयार झाला. औपचारिक शिक्षण घेउन चिरंजिवांनी काय दिवे लावलेत, असा प्रश्‍न पालक करू लागले. किंवा उच्च शिक्षण घेतले नाही म्हणून सचिन तेंदूलकरचं काय बिघडलं? असंही म्हणणारे भेटतील. मुळात शिक्षण घेणे आणि नोकरी मिळविणे हे समीकरणच झालं. शहाणा, सुसंस्कृत होण्याचा शिक्षणाचा संबंधच कुठे उरला? शिक्षण हे नोकरी मिळवून एैशोआरामात जीवन जगण्यासाठीच असतं, असे म्हटले तर काय चुकलं?
आज सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती झपाटयाने खेडयापाडयापर्यंत पोहचली. जि.प.शाळा "झोलबा पाटलाचा वाडा' वाटण्याइतपत आपली पत गमावून बसल्या. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा ताडताड इंग्रजी बोलावा असं वाटू लागलं. त्याला चांगल्या कॉन्व्हेंमध्ये शिकविण्यासाठी तो मागेल ती रक्‍कम मोजू लागला. जमाण्याच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर स्पर्धा आवश्‍यक, हे सुत्र प्रत्येकाच्या अंगात चांगलं भिनलं आहे. आपल्या मुलानं शिक्षण फक्‍त नोकरीसाठी घ्यावं, अशी मानसिकता तयार झाली. शासनही शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यातच धन्यता मानू लागलं. "आरटीई' अंतर्गत मुलाला प्रवेश मिळावा म्हणून वडिल मोठया शाळेचे स्वप्न पाहू लागले. शेवटी पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळाला की पूर्वजांचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद पालकांना वाटायला लागला. आम्ही इतर शाळांच्या तुलनेत कसे उत्तम शिक्षण देतो, याबद्‌दलची बढाई मारण्यात शाळेच्या संचालकांपासून मुख्याध्यापकांपर्यंत कुठेच कमतरता बाळगली जात नाही. आता शिक्षणाच्या नावाने इतका सुकाळ असताना, माशी कुठे शिंकते कोण जाणे? समजा एखादया नामांकित शाळेत मुलाला प्रवेश मिळाला तर समाजातील गरीब पालक आधीच या शाळेत असलेल्या धनाठय पालकांच्या मुलांशी कुठल्याबाबतीत स्पर्धा करणार आहेत का? शिक्षणाची की आर्थिक संपन्नतेची? मुलांच्या निष्पाप मनावर कुठेल संस्कार घडवतो. विद्यार्थ्यांना "मठ्‌ठ' निर्बुद्‌ध म्हणून शिवी देणे कायदयाने गुन्हा ठरविले जाते. मग अशा वातावरणात आपण श्रीमंत मुलांच्या तुलनेत गरीब आहोत, हेच संस्कार त्यांच्या मनावर बिेंबविणार आहोत का?
त्याच्या मानसिक जडघडणीच्या काळात त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचे काम कोण करतंय?अशा एक ना अनेक प्रसंग बालमनावर आघात करून जातात. जसे आम्ही तशीच आमची शिक्षणपद्‌धती आहे. तिच्यात तसुभरही कमी नाही. हुशार मुलांना पहिल्या बाकावर आणि आकलनात मागे पडलेल्या विद्यार्थ्याला मागच्या बाकावरील स्थान देण्यात येंतं. अमीर खान यांचा "तारे जमिनपर' या विषयावर नेमका प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांतील वेगळी वैशिष्टये ओळखून त्याच्या उपचार करणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम करतो. परंतु शिक्षकही आपले काम सोपें कसे होईल,या विचारात परंपरेने चालत आलेल्या आयुधांचा वापर करून हुशार विद्यार्थ्यांनाच पॉलीश करण्याचं काम करतात तेव्हा एकंदर शिक्षण पद्‌धतीची कीव करावीसी वाटते. पुस्तकातील किडे होउन जगण्यापेक्षा निसर्गातील ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतलेलया अनुभवांना पुस्तकाची जोड दिली तर विद्यार्थीही आपलं जिवन घडवितील. रविंद्रनाथ टागोरांसारखं प्रयोगशिल होउन "शांतीनिकेतन' घडविण्याचं सामर्थ निर्माण करता येईल.

गुरुवार, 16 जुलाई 2015

जिन्ह गोविंद दिया बताय


गुरू गोविंद दोउ खडे, काके लागू पाय
बलिहारी गुरू आपनी, जिन्ह गोविंद दिया बताय !

गुरू आणि गोविंद एकाच वेळी माझ्यायासमोर उभे राहिले तर मी कोणाचे पाय पकडावे, असा प्रश्‍न कबिरांना पडताच ते म्हणतात, हे बलिहारी मी तर गुरूंचेच पाय अगोदर पकडणार . कारण गुरूंमुळेच ईश्‍वरा मला खरे तर तुला भेटता आले. हा भाव गुरूची कृतज्ञता व्यक्‍त करण्यास पुरेसा आहे.
गुरूची परंपरा संपूर्ण विश्‍वात प्रचलित आहे. "गुरू बिन ज्ञान नही' म्हणतात. गुरूविषयीची मतभिन्नता असली तरी गुरूशिवाय मार्ग नाही हेच खरे. कोणी गुरूला निसर्गात पाहतो. तर कोणी विशिष्ट व्यक्‍तीत गुरूची स्थापना करतो. कोणी अनुभवांना गुरू मानतो. गुरू हे निसर्गातील एक तत्व आहे. भारतीय परंपरेने तर गुरूला परमेश्‍वरापेक्षाही मोठा दर्जा बहाल केलेला आहे. जीवनात पदोपदी मिळणारे अनुभवही कधी कधी गुरू होउन मार्गदर्शन करतात. तेव्हा जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. त्यासाठी दृष्टी प्राप्त होणे आवश्‍यक असते आणि ती दृष्टी देण्याचं काम गुरू करतो. अज्ञानाकडून ख-या ज्ञानाकडे नेणारा हा फक्‍त गुरूच असतो. भारतासारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या चिनमध्येही गुरूंची परंपरा आहे. ताओ धर्माचे लाओत्से, कन्फूसिअस, जापानमध्ये झेन, ग्रीसमध्येही सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो त्याचा शिष्य ऑरिस्टाटल आदींची दैदीप्यमान परंपरा लाभली आहे. जगात गुरूला "मास्टर' असे संबोधिले जाते. भारतातही रूषींमुनींपासून संतापर्यंत गुरूंचा वारसा अलिकडच्या काळापर्यंत मोठया विनम्रतेने जोपासला जात आहे. नाथ संप्रदायात मच्छींद्रनाथांपासून सुरू झालेली गुरूपरंपरा निवृत्तीनाथ यांच्यापर्यंत येउन पोहचलेली दिसते. वारकरी संप्रदाय, बौद्‌ध, जैनांनीही गुरूंविषयीचे गुणगाण केले आहे. संगीत क्षेत्रात "उस्ताद' शिवाय उत्कर्ष नाही, असं मानल्या जातं. तशीच उर्दू साहित्यातही शागिर्द गुरूचा शोध घेत असल्याचे दिसून येते. "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव' असे संत ज्ञानदेवांनी म्हटले आहे. ज्ञान देतात ते गुरू. शिळेपासून शिल्प तयार होउ शकते, पण त्यासाठी शिल्पकार लागतो. विद्यार्थीरूपी शिल्प घडविण्याचे काम गुरू मोठया लिलयेने करतो. योगी रामकृष्ण परमहसं तर आपल्या लाडक्‍या शिष्यासाठी वर्षोगणती प्रतीक्षा करीत बसले होते. स्वप्नात भेट देणारा अतिशय परम शिष्य नरेंद्र याला साक्षात समोर पाहून त्यांनी भावविभोर वृत्तीने मारलेली मिठी गुरूची शिष्याविषयी ओढ दर्शविते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही भगवान बुद्‌ध, महात्मा ज्योतीबा फुले आणि संत कबिर यांना गुरूस्थानी मानले होते.
देवापेक्षाही अधिक गुरूचा महिमा मानण्यात येतो. अंधकारातून प्रकाशाकडे घेउन जाणारा तो गुरू, अशी गुरूची व्याख्या करण्यात येते. वेद, उपनिषद, पुराण, गीता आदींमधून गुरूंची महती गायीलेली आहे. वयाने अतिशय लहान असलेल्या अष्टावक्राच्या आत्मज्ञानाची चुणूक पाहून जनक राजाने त्याला गुरू मानले होते. शिख धर्मात तर गुरूपरंपरेविषयीचं खूप मोठं तत्वज्ञान पाहायला मिळतं. परंपरेने चालत आलेली "गुरू' ही संज्ञा किती मोठी आहे, तिचं महत्व या धर्मात सांगीतलं आहे. गुरूंच्या पेक्षा शिष्य मोठा आहे. कारण शिष्याला ज्ञानाची तहान लागलीच नाही तर तो गुरूपर्यंत येईल तरी कसा? म्हणून या धर्माचे संस्थापक गुरूनानकजी म्हणतात की गुरू शोधण्याआधी तू शिक ! त्यानंतरच तुझयाकडे इच्छीत गुरू चालत येईल, असं काहीसं ओशो रजनिस एके ठिकाणी म्हणतात.
शिखांत दहा गुरूंची परंपरा कायम आहे. कारण गुरूला महानता मिळाल्यानंतर गुरू होण्याचा मोह सर्वांना होतो. जिकडे तिकडे गुरूंचं पिक आलेलं दिसतं. अशा बिकट क्षणी खरा गुरू मिळणं अतिशय कठीण असतं. परंपरा प्रदुषित झाल्यानंतर ती तोडणे तितकेच महत्वाचे असते. म्हणून गुरू नानक नुसतं शिष्य म्हणून जगण्याचं तत्वज्ञान सांगतात. शिख धर्मात शिष्यालाही गुरूऐवढं महत्व प्राप्त करून देण्यात आलेले आहे. "गुरू ग्रंथसाहिब' हा पवित्र धर्मग्रंथ गुरूच्याच रूपात आजही अनुयांनाना मार्गदर्शक ठरतो. गुरू तंत्राची प्रशंसा सगळया शास्त्रात करण्यात आलेली आहे.
भगवान श्रीकृष्ण महाभारतात तर विविध रूपांत वावरताना दिसतात. परंतु धर्नूधर अर्जुनाला आपल्या कर्तव्यावाचा विसर पडताच त्याला रणांगणावर जाणिव करून देण्यासाठी श्रीकृष्णांनी घेतलेली भूमीका महत्वाची आहे. अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगीतली. भगवत्‌गीतेतील तत्वज्ञान अध्यात्मिक तर आहेच, परंतु माणसाच्या जगण्याला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारे आहे. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश सांगणारी भगवत गीता आजही जगण्याचं बळ देतं. इतिहासात गुरूबरोबर शिष्याचंही मोठेपण दिसून येते. एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा प्रत्यक्ष समोर ठेवून विद्या अवगत करतो. गुरूंनी अंगठा मागताच क्षणाचाही विलंब न लावता तो गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. ही गुरूभक्‍ती कितीतरी मोठी आहे. विनोबा भावे महात्मा गांधीना गुरू मानीत. ते एका ठिकाणी म्हणतात की, मी महात्मा गांधींना गुरूस्थानी जरूर मानतो. पण मी त्यांच्या खांदयावर बसून त्यांच्या पुढचं जग पाहू शकतो. गुरूचं मार्गदर्शन घेउन शिष्यांनाच आपला मार्ग तयार करायचा असतो. गुरूंचा संबंध शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीशी असतो. गुरूंच्या पावलांवर पाउल टाकून गुरूंनी स्वीकारलेल्या मार्गाचं अनुकरण करायचं नसतं, असं एकंदर गुरूशिष्य परंपरेतील सार दिसून येतं. भगवान बुद्‌धांनी आपल्या शिष्यांची अनेकदा परीक्षा पाहिली. शिष्याला तावून सलाखून काढल्यानंतर तो ज्ञान मिळविण्या योग्य झाला की नाही, यासाठी ते त्यांची कठोर परीक्षा घेतात.
आज भारताकडे एक महाशक्‍तीच्या रूपात पाहण्यात येते. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पुरातन काळापासून मिळालेले वैभव काळाच्या उदरात गडप झालेले असले तरी कालांतराने पुरातन संस्कृतीचे अवशेष पुन्हा मोठया प्रमाणात सापडत आहेत. जुन्या ज्ञानाचे भंडार दिवसेंदिवस उलगडत आहे. उद्याच्या विज्ञानाला जन्म देणारं अध्यात्म हे कधीच संपणार नाही. म्हणून जगाचा महागुरू होण्याची संधी आयती भारताकडे आलेली आहे. या संदर्भात चिनमधील विचारक लाओत्से आयुष्याच्या उत्तर काळात एका अदृष्य संकेतामुळे चिन सोडून हिमालयाच्या दिशेने पळत सुटले होते. त्यांना हिमालयाच्या दिशेने एक तारा चमकताना दिसला होता, म्हणे. आज सगळा देश भारताकडे एक महागुरू म्हणून मोठया आशेने पाहात आहे. नॉस्ट्राडम याने केलेल्या शंभर भाकीतांपैकी एक हेही असावे असे वाटते.




                                                                                                 * विजयकुमार राऊत


 
Blogger Templates